वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

सकळ तुझे पायी मानिला

🙏 3. संत तुकाराम · ABH-080556 · अभंग क्र. ३००५

3005.
सकळ तुझे पायी मानिला विश्वास । न करी उदास आता मज ॥१॥
वाचे गाता गोड आइकता कानी । पाहाता लोचनी मूर्ती तुझी ॥धृपद॥
मन स्थिर माझे झालेसे निश्चळि । वारिले सकळ आशापाश ॥२॥
जन्मजराव्याधि निवारिले दुःख । वोसंडले सुख प्रेम धरी ॥३॥
तुका म्हणे मज झाला हा निर्धार । आता वाया फार काय बोलो ॥४॥

अर्थ :
तुझ्या पायाच्या ठिकाणीच मी सर्व विश्वास मांडला आहे त्यामुळे देवा तू मला आता उदास करु नकोस. देवा तुझे नाम वाचेने गाताना मला फार गोड वाटते कारण तुझी किर्ती ऐकताना तसेच तुझी मूर्ती डोळयाने पाहताना मला खूप सुख होते. देवा माझे मन तुझ्या पायाच्याच ठिकाणी स्थिर झाले असून तेथेच ते निश्चल झाले आहेत निश्चिंत झाले आहेत आणि सर्व आशापाशच नाहीसा झाला आहे. जन्म जरा व्याधी या सर्व दु:खाचे निवारण झाले असून देवाच्या प्रेमसुखाची धार माझ्या अंतरंगात व माझ्या बाह्यरंगात ओसंडून वाहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी तुझ्या पायाच्या ठिकाणी पूर्ण विश्वास ठेवण्याचा निर्धारच केलेला आहे तर मग मी व्यर्थ जास्त फार काय बोलावे ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग