वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सांगतो तुम्हासी भजा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077313 · अभंग क्र. २९७०

2970.
सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला । नाही तरि गेला जन्म वाया ॥१॥
करिता भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरी वाहावसी ॥२॥
काही न लगे एक भावचि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥

अर्थ :
हे लोकांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विठ्ठलाचेच भजन करा त्याचीच भक्ती करा त्याला भजा जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा जन्मच वाया गेला असे समजा. अहो तुम्ही जर संसारासाठी अनेक प्रकारचे कष्ट करत राहाल तर विठ्ठलाची भक्ती करण्यापासून तुम्ही अंतराल आणि भवनदीच्या पुरामधे वाहात जाल. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी दुसरे काहीच लागत नाही केवळ एकनिष्ठ भक्तीभाव लागतो हे मी तुम्हाला विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग