वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

माझा बाप दिनानाथ । व

🙏 3. संत तुकाराम · ABH-077152 · अभंग क्र. २९९३

2993.
माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥
कर ठेवुनिया कटी । उभा चंद्रभागे तिटी ॥धृपद॥
गळा वैजयंतीमाळा । रूप डोळस सांवळा ॥२॥
तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥

अर्थ :
माझा बाप दीननाथ आहे तो भक्तांची वाट पाहात आहे. तो आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून चंद्रभागेच्या तटी उभा आहे. त्याच्या गळयामध्ये वैजयंती माळ आहे आणि तो खूपच डोळस असून सावळा स्वरुपाचा आहे असे त्याचे रुप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माझ्या दीनानाथ बापाने भक्तांना भेटण्यासाठी आपले बाहू सदा उभारलेले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग