वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

माझे जीवन तुझे पाय ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077372 · अभंग क्र. २९९४

2994.
माझे जीवन तुझे पाय । कृपाळु तू माझी माय ॥१॥
नेदी दिसो किविलवाणे । पांडुरंगा तुझे तान्हे ॥धृपद॥
जन्ममरण तुजसाठी । आणीक नेणे दुजी गोठी ॥२॥
तुका म्हणे तुजविण । कोण हरील माझा सीण ॥३॥

अर्थ :
देवा पाडूरंगा तू कृपाळू आहेस माझी आई आहेस आणि तुझे पाय म्हणजेच माझे जीवन आहे. हे पाडूरंगा अरे तुझ्या तान्ह्याला तू कधीही केविलवाणा दिसू देऊ नको. देवा मी जन्ममरण भोगीन केवळ तुझ्यासाठीच आणि तुझ्यावाचून दुसरी कोणतीही गोष्ट मी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्यावाचून माझा शीण दुसरा कोण हरण करील ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग