वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

समर्थासी लाज आपुल्या

🙏 3. संत तुकाराम · ABH-076994 · अभंग क्र. २९९८

2998.
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥
न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचे ॥धृपद॥
मान भलेपण नाही फुकासाठी । जयावरी गाठी झीज साहे ॥२॥
तुका म्हणे हे तू सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाही ॥३॥

अर्थ :
समर्थाला आपल्या नामाची लाज असते, त्याला काळजी असते त्यामुळेच त्याला कोणीही शरण आले तर शरण आलेल्याचे रक्षण करण्याची काळजी चिंता त्याला असते. मग शरण आलेल्याचे गुण किंवा दोष त्याने केलेले अन्याय हे काहीही कर्म समर्थ पाहात नाहीत केवळ त्याला सुख देऊन त्याचे दु:ख निवारण करण्याचा त्रास तो सोसत असतो. मान आणि भलेपणा हा फुकट मिळत नाही तर त्यासाठी पदरच्या काही गोष्टीही झिजवाव्या लागत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे सर्व तू जाणतो आहेसच पण आता मी अधीर झालो की मला आता धीरच धरवत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग