बोल नाही तुझ्या दातृ
2984.
बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावे ॥१॥
दंभे करी भक्ती सोंग दावी जना । अंतरी भावना वेगळिया ॥धृपद॥
चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व । किती करू गर्व आता पुढे ॥२॥
तुका म्हणे देवा तू काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
अर्थ :
अरे तुझ्या दातृत्वपणा विषयी बोलण्यासारखे काहीच नाही परंतू आम्हीच सर्वभावे अविश्वाशी आहोत. अहो आम्ही भक्ती तर करतो परंतू दंभाने भक्ती करतो लोकांना दाखवण्यासाठी आम्ही भक्ती करतो परंतू आमच्या अंत:करणात काहीतरी वेगळयाच भावना असतात. अरे देवा आमच्या चित्तात तूच साक्ष आहे तुला सर्व काही कळते पुढे आता आम्ही किती गर्व करावा ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा या आमच्या अवघड कर्मापुढे तू तरी काय करणार आहेस ?
