देह नाशिवंत अभ्राची
2998.
देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची ॥१॥
जळगारीं जैसे उदक नाथिलें । का मृगजळ पसरलें चहुंकडे ॥२॥
परुषाची छाया वाउगाचि भास । चोराचा पै लेश काय तेथे ॥३॥
रज्जु देखतांचि भासतसे सर्प । एका जनार्दनी दर्प संसाराचा ॥४॥
