तातडीची धाव अंगा आणि
2977.
तातडीची धाव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चिंतांचा ॥१॥
म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥धृपद॥
कोरडे वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचे ते ॥२॥
तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली । साठवण्या खोली कासयांची ॥३॥
अर्थ :
कोणत्याही गोष्टीसाठी जर तातडी केली धावाधाव केली तर आपल्या अंगाला व्यर्थ शीणभाग होऊन कामामध्ये निश्चिंतीचा खोळंबा येतो. त्यामुळे कोणतेही कार्य करताना विचारानेच केलेले चांगले राहाते आणि त्याविषयी मर्यादा ठेवून बोललेलेच कामाला येत असते. विवेक नसताना केवळ वैराग्याच्या कोरडया गोष्टी केल्या तर काही उपयोग होत नाही त्यामुळे केवळ उन्मत्तपणा आणि अविचारीपणाच वाढत जातो आणि ज्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य आहे तोच खरा शूर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो झऱ्याची झुळझुळ वाहणारी चाल ही उत्तम परंतू साठवण झालेल्या पाण्याची खोली काय कामाची ठरते.
