वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

अवघे आयुष्य काळाधीन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085086 · अभंग क्र. २९७२

2972.
अवघे आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त गुंतले संसारांत ॥१॥
सापें दर्दूर गिळियेला मुखी । तेणेंचि तो शेखी मक्षिका धरी ॥२॥
ऐसे हावभरी प्राणी पै नाडले । म्हणती माझे वहिले कन्यापुत्र ॥३॥
एका जनार्दनी मृगजळाची आशा । पडे तेणे फांसा गळा बळे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग