सांडी पा सांडी संसार
3006.
सांडी पा सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥
न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥
षड्वैरीयांचेंक तोडी पा बिरडें । करी तू कोरडे आशापाश ॥३॥
एका जनार्दनी शरण स्वभावे । भोगी तू गौरव वैकुंठीचे ॥४॥
