वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आम्हा देणे धरा सांगत

🙏 3. संत तुकाराम · ABH-080609 · अभंग क्र. ३००८

3008.
आम्हा देणे धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणे माझे चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोने ॥धृपद॥
व्रत एकादशी दारी वृंदावन । कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥२॥
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥

अर्थ :
आम्हाला जर काही दयायचेच असेल तर ते मी तुमच्या कानामध्ये सांगतो ते म्हणजे असे की, तुम्ही विठोबाच्या पायाचे चिंतन मनामध्ये करत राहा. एवढे जरी तुम्ही मला दिले तर त्या योगाने माझ्या चित्ताला समाधान होईल मग मला तुमचे मिष्ठान्न विलास सोने वगैरे काहीच नको. तुम्ही एकादशी व्रत करा, दारामध्ये तुळशी वृंदावन राहू दयावे, कंठामध्ये हरीनाम धारण करा आणि गळयामध्ये तुळशीमाळेचे लेणे परिधान करावे. तुकाराम महाराज म्हणतात, जर असे या नियमाने कुणी वागले तर माझ्यासाठी तो दिवाळी दसरा सणच वाटेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग