वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

उपदेश किती करावा खळा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077398 · अभंग क्र. २९९७

2997.
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरे काही ॥१॥
शुद्ध का वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणे ॥धृपद॥
नाही भाव मनी नाइके वचन । आपल्या आपण नाडियेले ॥२॥
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रात्रंदिवस ॥३॥

अर्थ :
मूर्ख मनुष्याला उपदेश तरी किती वेळा करावा व किती करावा त्यांना काही चांगले आवडतच नाही. चांडाळ मनुष्याची वासना म्हणजे इच्छा हे शुध्द का नसतात काही कळत नाही परंतू त्याने आपले पूर्वपुण्य संचित वाईट वर्तन करुन त्याची होळीच केलेली असते. तो देवगुरु आणि वेद यांच्याविषयी खरा भक्तीभाव कधीही मनात ठेवत नाही आणि संतांनी सांगितलेले चांगले वचन तो कधीही ऐकत नाही यामुळेच तो स्वत:च्याच कर्माने नडला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अहो अशा दुष्ट अभाविक चांडाळ मूर्ख मनुष्याला त्याच्या आईने जन्मच का दिला असेल तो रात्रंदिवस निरर्थक बडबडच करत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग