वायांची सोस संसार का
3005.
वायांची सोस संसार कामाचा । रामनामी वाचा रंगी का रे ॥१॥
यापरती जीवा सोडवण नाही । वेदशास्त्री पाही भाष्य असे ॥२॥
पुराणे डांगोरा पिटती नामाचा । ते तू का रे वाचा न वदसी ॥३॥
सायास साधने न लगे आणीक । एका जनार्दनी ऐक्य मन करी ॥४॥
