वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नाही जप तप जीवाची आट

🙏 3. संत तुकाराम · ABH-080741 · अभंग क्र. ३००३

3003.
नाही जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाही केली ॥१॥
निजलिया ठायी पोकारिला धावा । साकडे ते देवा तुझे माझे ॥धृपद॥
नाही आणूनिया समर्पीले जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥
तुका म्हणे आम्ही वेचिली उत्तरे । घेतली उदारे मायबापे ॥३॥

अर्थ :
देवा मी कधीही जपतप करुन जीवाचा आटापिटा केली नाही व मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण आणले नाही. देवा मी निजल्या ठिकाणाहून तुझा धावा अगदी स्वस्थपणे केला आहे त्यामुळे तर तुला माझे साकडे पडले आहे. देवा मी कधीही कोणत्या प्रकारचे जल आणून तुला समर्पण केले नाही केवळ तुझे नामचिंतन करण्याचीच सेवा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही जे शब्द खर्च करुन तुमची स्तुती तुमचे वर्णन गायिले आहे ते तुम्ही उदार मायबापानी स्वीकारले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग