वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

कावळ्याच्या गळा मुक्

🙏 3. संत तुकाराम · ABH-077168 · अभंग क्र. २९८६

2986.
कावळ्याच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥धृपद॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन । वाउगाचि सीण होय त्यासी ॥२॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यासी वाया सीण करू नये ॥३॥

अर्थ :
कावळयाच्या गळयामध्ये मोत्याची माळ जरी घातली तरी त्याला ते शोभून दिसते काय ? हत्तीच्या अंगाला जरी कस्तुरीचा लेप लावला तरी कस्तुरीचे स्वरुप कस्तुरीचा सुगंध तो हत्ती काय जाणणार आहे ? बगळयाला कितीही समजून सांगितले की अरे मासे पकडण्यासाठी तू जे ध्यानस्थ बसण्याचे सोंग करतो तसे करु नये तरी त्याला ते पचनी पडणार आहे काय त्याला ते शब्द रुजणार आहेत काय उलट जो त्याला चांगले उपदेश वचन सांगेल त्यालाच त्याचा शीण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी त्याप्रमाणे जे अभाविक लोक आहेत त्यांना चांगला परमार्थिक उपदेश करण्याचा त्रास करुन घेऊ नये व व्यर्थ आपल्याला श्रमही करुन घेऊ नये.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग