किती वेळां जन्म किती
2994.
किती वेळां जन्म किती वेळा मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥
जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥
पावलिया मरण सहज नरक कुंडीं । कोण तया सोडी अधमासी ॥३॥
स्वप्नामाजी नेणे परमार्थ मानसी । सदा चौर्यांयंशी फेरे भोगी ॥४॥
एका जनार्दनी नोहेंचि सुटिका । भाग्यहीन देखा मरे जन्में ॥५॥
