वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जळो ते जाणीव जळो ते

🙏 3. संत तुकाराम · ABH-077100 · अभंग क्र. २९६५

2965.
जळो ते जाणीव जळो ते शाहाणीव । राहो माझा भाव विठ्ठलपायी ॥१॥
जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायी ॥धृपद॥
जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचे ॥२॥
जळो हे शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठी ॥३॥
तुका म्हणे येथे अवघेचि होय । धरी मना सोय विठोबाची ॥४॥

अर्थ :
शाब्दिक ज्ञानाला व शहाणपणाला आग लागो व माझा खरा भक्तीभाव विठ्ठलाच्या पायीच राहो. आचार आणि विचाराला आग लागो आणि माझे मन विठ्ठलाच्या पायी स्थिर राहो. लोक लौकिक दंभ व मान यांना आग लागो व माझ्या मनाला विठ्ठलाचेच ध्यान लागो. हे शरीर व शरीरासंबंधी जे कोणी असतील त्या सर्वांना आग लागो आणि माझ्या कंठामध्ये एक परमानंदच राहो. तुकाराम महाराज म्हणतात, हे मना असे केल्यानेच सर्व काही साध्य होणार आहे त्यामुळे विठोबाचाच मार्ग तू धर.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग