वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

विनवितो चतुरा तुज वि

🙏 3. संत तुकाराम · ABH-076986 · अभंग क्र. २९८९

2989.
विनवितो चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥
तुझे दास ऐसे जगी वाखाणिले । आता नव्हे भले मोकलिता ॥धृपद॥
माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझे ॥२॥
लोभ मोह माया आम्हा बांधविता । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥
तुका म्हणे मी तो पतितचि खरा । परि आलो दातारा शरण तुज ॥४॥

अर्थ :
हे दातारा पाडूरंगा चतुरानना विश्वंभरा मी तुला विनंती करीत आहे ती कृपया तुम्ही ऐकावी. हे पाडूरंगा अरे जगाने मी तुझा भक्त आहे अशी माझी किर्ती वर्णन केली आहे गायिली आहे त्यामुळे तू जर आता माझा त्याग केला तर हे चांगले होणार नाही. अहो देवा माझे गुणदोष तुझ्यावाचून जगात कुणाला माहित आहे काय आणि तुझे नाम पतितपावन आहे त्यामुळे माझ्या पतिताला तू पावन करावेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे दातारा मी पतित आहे हे तर खरेच आहे परंतू मी तुला शरण आलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग