उघडा अनुभव असोनिया द
2975.
उघडा अनुभव असोनिया देही । वायांचि प्रवाहीं का पडसी ॥१॥
संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडता अंधकार सुटे जाण ॥२॥
भ्रमतां भ्रमतां नयेचि बाहेरी । चौर्यांयशी फेरी पुनः पुनः ॥३॥
एका जनार्दनी नको हा विचार । वाया फजितखोर हाशी बापा ॥४॥
