संसारी तरले बोलती ते
2996.
संसारी तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती ॥१॥
नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना तैसे ॥२॥
न तरती भवसागरीं बुडती हव्यासे । लागतसे पिसे धन आशा ॥३॥
एका जनार्दनी आशा हे सांडोनी । गोविंद चरणी मिठी घाला ॥४॥