कळो आला भाव माझा मज
2982.
कळो आला भाव माझा मज देवा । वायाविण जीवा आटकेली ॥१॥
जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी । न लगे शेवटी हाती काही ॥धृपद॥
देव जोडे म्हणोन सांगतसे लोका । माझा मीच देखा दुःख पावे ॥२॥
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
अर्थ :
देवा माझा आतरभाव मला आत कळून आला आहे इतक्या दिवस मी व्यर्थ जीवाची आटाआटीच केली आहे. मी अक्षराला अक्षर जोडून केवळ तोंडपिटी केली आहे परंतू शेवटी देखील माझ्या हाती काहीच लागले नाही अरे मी लोकांना सांगत होतो की, तुम्ही देवाची प्राप्ती करुन घ्या परंतू देवाची प्राप्ती करुन घेण्याविषयी मी समर्थ राहिलो नाही त्यामुळे मी दु:ख भोगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे मला संसारही नाही आणि तुझे पायही नाही असा प्रकारे दोन्ही ठिकाणी मला आता आधार राहिलाच नाही.
