वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

रत्नाच्या वोवणी कांच

🙏 3. संत तुकाराम · ABH-076991 · अभंग क्र. २९६२

2962.
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारे ॥१॥
जातिचा स्वभाव आला डोळ्या आड । तया घडे नाड न कळता ॥धृपद॥
कामधेनु देखे जैशा गाईम्हैसी । आणिकाते ऐसी करोनिया ॥२॥
तुका म्हणे काय बोलोनिया फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥

अर्थ :
एखादा मूर्ख मनुष्य त्याच्या अधिकाराने रत्नाची माळ काचे प्रमाणे समजून तिचा अव्हेर करुन तिला दूर फेकून देत असतो. खरा तर तो त्याच्या जातीचाच स्वभाव आहे असे समजावे कारण तो मूर्खच आहे व त्याला त्याचा मूर्खपणाच्या जातीचा स्वभावच डोळयाच्या आड आला व त्याला रत्नपरीक्षा झाली नाही त्यामुळे त्याचे व्यावहारीक नुकसान झाले आहे. ज्याप्रमाणे सामान्य गाई म्हशी असतात त्याप्रमाणे कामधेनूला तो सामान्य पशु समजून त्या कामधेनूला पाहात असतो, तुकाराम महाराज म्हणतात, आता जास्त बोलून काय उपयोग आहे कारण जो जसा व्यवहार करतो तो त्याला शोभून दिसत असतो त्यामुळे चांगल्या वस्तू या चांगल्याच माणसाला समजत असतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग