आषाढी निकट । आला कार
2975.
आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ॥१॥
पुरे दोन्हीच बाजार । न लगे आणीक व्यापार ॥धृपद॥
तेचि घ्यावे तेचि घ्यावे । कैवल्याच्या रासी भावे ॥२॥
काही कोणा नेणे । विठो वाचूनि तुका म्हणे ॥३॥
अर्थ :
आषाढी संपली की जवळच लगेच कार्तिकीचा बाजार येत असतो. वारकऱ्यांसाठी हे दोनच बाजार पुरेसे आहेत इतर कोणताही व्यापार त्यांना लागतच नाही. अहो येथे तुम्ही केवळ एक हरीनामच घ्या हरीनामच घ्या आणि कैवल्याच्या राशी आपल्या बांधून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत वारकरी येथे एका विठोबावाचून काहीही व कोणालाही जाणत नाहीत ओळखत नाहीत.
