वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

धन मेळवूनि कोटी । सव

🙏 3. संत तुकाराम · ABH-077165 · अभंग क्र. २९९२

2992.
धन मेळवूनि कोटी । सवे नये रे लंगोटी ॥१॥
पाने खाशील उदंड । अंती जासी सुकल्या तोंड ॥धृपद॥
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटी गोवऱ्या सांगाती ॥२॥
तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ॥३॥

अर्थ :
अरे तुम्ही कोटयावधी धन मिळवून ठेवा परंतू तुमच्याबरोबर साधी लंगोटी देखील येणार नाही. अरे तू आता पुष्कळ पाने खाशील परंतू सुकल्या तोंडानेच तू शेवट मरणार आहेस. अरे तू आता चांगल्या पलंगावर चांगले अंथरुन टाकून निजतोस परंतू शेवटी तुला गोवऱ्याच सोबतीला राहणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अरे एका रामाला तुम्ही जर विसरले तर बाकी तुम्हाला सारे श्रमच होणार आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग