शब्द झणी येऊ नेदी दृ
2971.
शब्द झणी येऊ नेदी दृष्टीपुढे । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥
जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचे ॥२॥
तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडू डोया न धरू भीड ॥३॥
अर्थ :
छळवादी आणि अभक्त हे फारच वाईट ते चांगले शब्द आपल्या कानात पुढे आपल्या दृष्टीपुढे देखील येऊ देत नाहीत. अशा या दुर्जन मनुष्याच्या शब्दज्ञानाला तसेच त्याच्या बंडखोरपणाला जाळ लागो आणि त्याचे तोंड देखील जळून जाओ. तुकाराम महाराज म्हणतात जर असे मनुष्य सत्प्रवृत्ती असलेल्या माणसाला छळण्याकरता आले तर आम्ही त्यांची डोके फोडून त्यांना हाकलून देऊ त्यांची भीड आम्ही धरणार नाही.
