सर्पे धावोनि धरिल्या
2963.
सर्पे धावोनि धरिल्या तोंडी । सर्वांगा घालितसे बेडी ॥१॥
सर्पबाधेची सांकडीं । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥
रिघतां सदगुरुसी शरण । तैसे निरसे जन्ममरण ॥३॥
संसार सर्प मिथ्या देही । एका जनार्दनी सदा ध्याई ॥४॥