तरीच ही केली । दाने
2963.
तरीच ही केली । दाने वाईट चांगली ॥१॥
एक एका शोभवावे । केले कवतुक देवे ॥धृपद॥
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥
तुका म्हणे धुरे । डोळे भरिले परि खरे ॥३॥
अर्थ :
देवाने जगाला चांगले व वाईट मनुष्य दान केले आहेत ती केवळ यामुळेच, कारण वाईट मनुष्यामुळे तर खऱ्या चांगल्या मनुष्याची किंमत कळते व एकमेकांमुळे एकमेकांची शोभा वाढत असते असे कौतुक या देवाने केले आहे. अहो त्या देवाची सत्ता काय म्हणून सांगायची सर्व जगाचा चालक व सर्व जगाची सूत्रे त्याच्याच हातात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो लोकांचे डोळे तर विषय सुखाने व विकाराच्या धुरानेच भरले आहेत परंतू मी तुम्हाला देवाचे जे काही वर्णन सांगितले आहेत ते मात्र खरे आहे.
