वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

करावा संकोच चित्तासी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080920 · अभंग क्र. ३००२

3002.
करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥
देवाची पूजा हे भूताचे पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥
रुसावे फुगावे आपुलियावरी । उरला तो हरी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे संतपण याची नांव । जरी होय जीव सकळांचा ॥३॥

अर्थ :
जो काही संकोच करायचा असेल तो आपल्या चित्ताच्या भोवतीच करावा परंतू पुष्कळ लोकांना सुख मिळेल असेच वागत राहावे. भूतमात्राचे पालनपोषण करणे म्हणजेच देवाची पूजा आहे आणि अनेक जणांचा मत्सर करणे म्हणजे देवाला त्रास देण्यासारखेच आहे. अहो जर रुसायचे फुगायचे असेल तर स्वत:वरच रुसावे फुगावे कारण इतरांवर रुसणे फुगण्यासाठी इथे दुसरे कोण आहे सर्वत्र एक हरीच सामावला आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, जो, सर्वाचा जीव हा आपलाच जीव आहे असे समजतो याचेच नांव संतपणा आहे व तोच संत असतो.
2:26

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग