अशाश्वत देह जाईल जाई
2964.
अशाश्वत देह जाईल जाईल । वायांचि गमावील अभागी तो ॥१॥
न ये मुखी कदा श्रीरामचरित्र । वायांचि पै वक्त्र जल्पे सदा ॥२॥
दिननिशी कारी संसाराचा धंदा । नाठवी गोविंदा मूढ कांही ॥३॥
एका जनार्दनी अभागी तो खरा । तपाच्या डोंगरा हांव धरी ॥४॥
