वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

बहुत असती मागे सुखी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080879 · अभंग क्र. ३००७

3007.
बहुत असती मागे सुखी केली । अनाथा माउली जिवांची तू ॥१॥
माझिया संकटा न धरी अळस । लावुनिया कासे पार पावी ॥धृपद॥
कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाही पुन्हा ॥२॥
विचारिता नाही दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्याप्य कोणी ॥३॥
म्हणउनि दिला मुळी जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥
तुका म्हणे नाही जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥

अर्थ :
देवा तुम्ही यापूर्वी अनेकांचा उध्दार करुन त्यांना सुखी केलेत आणि तुम्ही अनाथांची माऊली देखील आहात. त्यामुळे तू माझ्या संकटाच्यावेळी आळस धरु नकोस तुझ्या कासेला लावून मला या भवनदीच्या पार कर. अहो कृपावंता तुम्ही ज्यांचा अंगीकार करता त्यांना पुन्हा जन्ममरणाचा संसारच नाही. देवा जर विचार करुन पाहिला तर तुझ्यासारखा बलवंत दुसरा कोण आहे आणि सर्वत्र व्यापलेला देखील दुसरा कोण आहे. म्हणूनच तर मी माझा सुरवातीपासूनच जीवभाव तुला अर्पण केला असून देह मिथ्या ठरवून समाधीस्थ मी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा मी तुझ्यावाचून दुसरे काही एक जाणत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग