पाहता पाहता नेत्र गे
2970.
पाहता पाहता नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥
जाऊनि धरितो माझे म्हणोनिया । परी ते वाया जाती सर्व ॥२॥
विषय भोगितो गर्दभाचे रितीं । लाभ तो निश्चिती लत्ताप्रहर ॥३॥
एका जनार्दनी मंडुकाचे परी । वटवट खरी संसारी ते ॥४॥
२९७१
पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे । तैसा नरदेह संसारासी ॥१॥
वाउगाची शीण पावती पतन । नेणे आपुलें विंदान भुलला वाया ॥२॥
मर्कटासो जेवी मदिरा पाजिली । भूतबाधा झाली तयावरी ॥३॥
सैरावैरा नाचे कोण तया हासे । एका जनार्दनी तैसे मनुष्यदेहीं ॥४॥
