होईल तो भोग भोगीन आप
3001.
होईल तो भोग भोगीन आपुला । न घली विठ्ठला भार तुज ॥१॥
तुम्हापासाव हे इच्छीतसे दान । अंतरीचे ध्यान मुखी नाम ॥धृपद॥
नये काकुलती गर्भवासांसाठी । न धरी हे पोटी भय काही ॥२॥
तुका म्हणे मज उदंड एवढे । नाचेन मी पुढे मायबापा ॥३॥
अर्थ :
हे विठ्ठला जे काही होईल ते प्रारब्धाचे भोग मी स्वत: भोगेन त्याचा भार मी तुझ्यावर घालणार नाही. देवा मी तुमच्यापासून केवळ एवढयाच दानाची इच्छा करीत आहे की, माझ्या अंतरंगात ध्यान आणि मुखात तुमचे नाम असावे. अहो देवा मला गर्भवास भोगावा लागेल व ते तुम्ही दूर करावे यासाठी मी तुमच्याकडे काकूळतीला येणार नाही कारण त्याविषयी आता माझ्या मनामध्ये काही भयच राहीलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू केवळ मला माझ्या अंतरंगामध्ये ध्यान आणि मुखात तुझे नाम एवढे दान दिले ना तर तेवढेच मला उदंड झाले मग मी माझ्या मायबापापुढे सुखाने नाचेन.
2:25
