वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नये माझा तुम्हा होऊ

🙏 3. संत तुकाराम · ABH-080430 · अभंग क्र. ३००६

3006.
नये माझा तुम्हा होऊ शब्दस्पर्श । विप्रवृंदा तुम्हा ब्राम्हणांसी ॥१॥
म्हणोनिया तुम्हा करितो विनंती । द्यावे शेष हाती उरले ते ॥धृपद॥
वेदी कर्म जैसे बोलिले विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
एका विद्वान ब्राम्हणाने तुकाराम महाराजांना घरी जेवण्यास बोलावले त्यावेळी तुकाराम महाराज त्यांना म्हणतात की, तुम्ही ब्राम्हण आहात तुम्हाला माझा शरीरस्पर्श काय तर शब्दस्पर्श देखील होऊ नये कारण तुम्ही विद्वान आहात. त्यामुळेच मी तुम्हाला एक विनंती करीत आहे की तुमच्या पंक्तीत मला बसू न देता जे काही तुमच्या भोजनानंतर उरले असेल तर ते माझ्या हाती दयावे. वेदाने विविध वर्णाला जे जे काही त्यांचे विहित कर्म सांगितले आहेत ते ते विहित कर्म त्या त्या वर्णाने त्याचा चांगला विचार करुन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रेष्ठ विद्वान ब्राम्हणहो तुमचा जो स्वधर्म आहे तो तुम्ही पालन करा तुमचे भोजन झाले की मग माझा भोजन करण्याचा अधिकार आहे तुमचे भोजन झाल्यानंतर जे शेष राहील ते मग आम्ही सेवन करु.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग