वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता तरी मज सांगा साच

🙏 3. संत तुकाराम · ABH-077011 · अभंग क्र. २९८३

2983.
आता तरी मज सांगा साच भावे । काय म्या करावे ऐसे देवा ॥१॥
चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघाचि ॥धृपद॥
कळे म्हणवूनी करीतसे वाद । दिसे भेदाभेद अंतरीचा ॥२॥
तुका म्हणे नको पाहू तू निर्वाण । देई कृपादान याचकासी ॥३॥

अर्थ :
अहो देवा आता तरी खऱ्या भावनेने तुम्ही सांगा की, मी काय करावे ? कोणतेही कार्य करत असताना जर त्या कार्‍याचे वर्म चुकले तर ते कार्य पूर्ण होत नसून आपल्याला तो त्रासच ठरतो व ते सर्व कर्म व्यर्थ ठरते. देवा अहो तुमच्या अंत:करणातील माझ्याविषयी भेदाभेद मला दिसतो आहे आणि तो मला कळला आहे म्हणूनच तर मी तुमच्याशी वाद तुमच्याशी भांडण करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे तू माझा फार अंत पाहू नकोस मला याचकाला तू कृपादान दयावेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग