वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

काय सुख आहे संसारी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085082 · अभंग क्र. २९७३

2973.
काय सुख आहे संसारी । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशी प्रपंचीं ॥१॥
जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचे ध्यान । नाही कधी आठवण । न ये मुखी रामनाम ॥२॥
ऐसा भार वाही खर । परितया न कळे साचार । आहे पुढे यातना अघोर । हे कांही नाठवीं ॥३॥
ऐसे होता भरले आयुष्य । मृत्युं पुन्हा येत जन्मास । ऐशा भोगी चौर्‍यांयशी निःशेष । एका जनार्दनी म्हणे त्यास लाज नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग