वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

न कळसी ज्ञाना न कळसी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077039 · अभंग क्र. २९८७

2987.
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळसी दर्शना धुंडाळिता ॥१॥
न कळसी आगमा न कळसी निगमा । न बोलवे सीमा वेदा पार ॥२॥
तुका म्हणे तुझा नाही अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥

अर्थ :
अहो देवा तुम्ही ज्ञानाने कळत नाही ध्यानाने कळत नाहीत साही दर्शनाने तुम्हाला सापडण्यास गेले तरीही तुम्ही सापडत नाहीत. देवा तू आगमाला आणि निगमाला म्हणजे शास्त्राला आणि वेदाला देखील कळत नाहीस तसेच ब्रम्हादिक देवांना देखील तुझे स्वरुपाची सीमा बोलवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझा अंत:पारच कळत नाही त्यामुळे तुझी प्राप्ती कशी करुन घ्यावी हाच विचार मला पडत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग