त्रिगुणात्मक देह पंच
2894.
त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटी निर्फळ होईल रया ॥१॥
दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटी तत्त्वता कांही नुरे ॥२॥
पंचभुते विरती ठायींचे ठायी । वाया देहादेही बद्धमुक्त ॥३॥
एका जनार्दनी नाथीलाची खेळ । अवघा मायाजाळ जाईल लया ॥४॥
