वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सकल गुणे संपन्न । एक

🙏 3. संत तुकाराम · ABH-076951 · अभंग क्र. २९११

2911.
सकल गुणे संपन्न । एक देवाचे लक्षण ॥१॥
वरकड कोठे काही कोठे काही । एक आहे एक नाही ॥धृपद॥
षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंती जाण ॥२॥
तुका म्हणे जेंजे बोला । तेंते साजे या विठ्ठला ॥३॥

अर्थ :
सर्व गुणाने संपन्न असणे म्हणजे हे एक देवाचेच लक्षण आहे. इतरांच्या ठिकाणी काही लक्षणे आहेत तर काही नाहीत. षडगुण ऐश्वर्य संपन्न ही एक भगवंतच आहे हे मात्र जाणून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाला जे जे गुण किंवा जे जे लक्षण आपण ऐकवू त्याच्याविषयी जे काही बोलू ते त्याला शोभूनच दिसते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग