प्राण रक्षणापुरतें ।
2880.
प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें ॥१॥
तैसा साधावा हा योग । जेणे साधे अंतरंग ॥२॥
रिघोनी कमळिणीपाशी । भ्रमर लोंधे अमोदासी ॥३॥
कोरडेंक काष्ठ भेदूनि जाय । तो कमळदळीं गुंतोनि राहे ॥४॥
एका जनार्दनी योग । ऐसा साधावा अनुराग ॥५॥
