तुम्हासी न कळे सांगा
2866.
तुम्हासी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवू मी ॥१॥
आहे तेथे सत्ता ठेविले स्थापूनि । प्रमाणेंचि वाणी वदे आज्ञा ॥धृपद॥
कृपा झाली मग न लगे अंगसंग । निजध्यासे रंग चढता राहे ॥२॥
तुका म्हणे मागे बोलिलो ते वाव । आता हाचि भाव दृढ झाला ॥३॥
अर्थ :
देवा तुम्हाला काय कळत नाही ते सांगा मग तुम्हाला काही मागण्याच्या अपेक्षाने मी विविध संकल्प मनामध्ये का वागू ? देवा तुमच्या सत्तेने मी जसा आहे तसाच राहीन आणि मी जे काही बोलेन ते तुमची आज्ञाप्रमाण मानूनच बोलेन. देवा एकदा की माझी तुमची माझ्यावर कृपा झाली तर मग मला तुमची अंगसंग देखील नको आहे कारण तुमच्या निजध्यासानेच प्रेमाचा रंग चढता राहील. तुकाराम महाराज म्हणतात, मी मागे देवा तुम्हाला जे काही बोललो आहे ते सर्व व्यर्थ झाले असे समजा आता स्वस्थ राहणे हाच माझा दृढनिश्चय झाला आहे.
