वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

करी ऐसी धावाधावी । च

🙏 3. संत तुकाराम · ABH-077201 · अभंग क्र. २८९३

2893.
करी ऐसी धावाधावी । चित्त लावी चरणापे ॥१॥
मग तो माझा मायबाप । घेईल ताप हिरूनी ॥धृपद॥
बहुतांच्या मते गोवा । होऊ जीवा नेदावा ॥२॥
तुका म्हणे करुणाबोले । धीर विठ्ठले निघेना ॥३॥

अर्थ :
देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी काहीतरी धावाधावी करावी आणि देवाच्या चरणाजवळच आपले चित्त लावावे. मग तो माझा मायबाप तुझे त्रिविधताप हरण करुन घेईन. अनेकजणांचे मते ऐकून आपला जीव अडचणीत येईल असे काही तू होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर करुणेने विठ्ठलाशी संवाद साधला त्याच्याशी बोलला तर विठ्ठलाला धीरच निघेनाशा होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग