निर्लज्ज होऊनि नाचे
2886.
निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचे वदे हरी सर्वकाळ ॥१॥
व्रत करी सदा नामाचे पारणे । अखंड ते तेणे रामकृष्ण ॥२॥
पंढरीची वारी घडे सर्वकाळ । कीर्तन कल्लोळ मुखी सदा ॥३॥
एका जनार्दनी भजनीं सादर । सर्व वेरझार खुंटे त्याची ॥४॥