सर्प बिळामाजीं रिगें
2879.
सर्प बिळामाजीं रिगें । हे तो देखतीक सवेगे ॥१॥
तैसा योगियांचा योग । सर्पापरी भूमी व्यंग ॥२॥
दाविता आचारू । हासताती लहान थोरू ॥३॥
म्हणती एक कर्मठ । ऐक म्हणती योगभ्रष्ट ॥४॥
एक निंदिती वंदिती । ऐशी आहे योगस्थिती ॥५॥
यापरीस उत्तम साधन । एका जनार्दनी शरण ॥६॥
