जंव देहाते देखती तंव
2910.
जंव देहाते देखती तंव माझे म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥
पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला की न कळे साचा ॥२॥
जीव आत्मा न मरे कोणे काळी । निमाला देह चतुष्टयाची होळी ॥३॥
एका जनार्दनी देहा देखती मरण । गेला आला नाही तो तैसाचि जाण ॥४॥
