प्रीतीचा तो कळवळा ।
2864.
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥
बहु नेदी रडो माता । दुश्चित होता धीर नव्हे ॥धृपद॥
वरी वरी तोंडापुरते । मोहोरी ते कळतसे ॥२॥
जाणोनिया नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥
अर्थ :
प्रेमाचा कळवळा आणि जिव्हाळा हा वेगळाच असतो. असेच प्रेम आई व मुलाचे असते मुलगा जर दु:खी कष्टी झाला तर ती त्याला रडूही देत नाही व तो जर दु:खी झाला तर तीला धीर धरवत नाही. वरवर तोंडापुरते गोड बोलणे त्याच्याविषयी प्रेम दाखवणे हे संकटकाळी किती व्यर्थ आहे हे कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, मला सर्व काही समजते परंतू तरी देखील मी नेणता असल्यासारखेच सर्वांना दाखवतो. खरे प्रेम कोणते खोटे प्रेम कोणते हे मला सर्व समजते मी लोकांसारखा नाही.
