वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

माझे माझे म्हणोनि कर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085039 · अभंग क्र. २९०४

2904.
माझे माझे म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिले फलकट ॥१॥
तनांचे बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥
स्वजन स्वगोत्र सारे करती विचार । काढा काढा म्हणती जाला भूमीभार ॥३॥
देहाची जनकें केवळ मातापिता । गेला गेला म्हणती तोचि देह असता ॥४॥
अष्टही प्रहर भोगी देह गेह वित्त । सेजेची भार्या पळे म्हणे भुतभूत ॥५॥
यापरी जाणोनी सांडी देहाची खंती । एका जनार्दनी राहिला विदेह स्थिती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग