वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

शत वर्षाचा कउल घेउनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085016 · अभंग क्र. २९०८

2908.
शत वर्षाचा कउल घेउनी । आलासी योनी नरदेहा ॥१॥
गर्भ जठरी सोहं सोहम् । जन्मतांची म्हणसी कोहं कोहम् ॥२॥
ऐसा ठकरा पापिष्ठा । पुढे कारिसी विषयचेष्टा ॥३॥
बाल तारूण्य गेले । पुढे वृद्धाप्य वयही आले ॥४॥
नाहे घडले कीर्तन । तो पुढे आले मरण ॥५॥
घेउनी जाती यमदुत । कुंभपाकीं तुज घालीत ॥६॥
नाना यातना ते करती । अग्निस्तंभा भेटविती ॥७॥
तेथे कोण सोडी तुज । आता म्हणसी माझे माझे ॥८॥
ऐसा भुलला गव्हार । भोगी चौर्‍यांशीचा फेर ॥९॥
फेरे फिरूनी नरदेहीं आला । एका जनार्दनी वाया गेला ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग