पूजन तो एक पुरे । वा
2861.
पूजन तो एक पुरे । वाचे स्मरे रामनाम ॥१॥
नको गंधाक्षता तुळशी । मुखी नाम अहर्निशी ॥२॥
धूप दीप नैवेद्य तांबूल । सदा वाचे नाम बोल ॥३॥
आर्ती धूपार्ती अक्षता । राम गाऊ निःसीमता ॥४॥
एका जनार्दनी शरण । सहज पूजा घडे जाण ॥५॥