वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता कोठे धावे मन । त

🙏 3. संत तुकाराम · ABH-076992 · अभंग क्र. २९०६

2906.
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंदु ॥धृपद॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ॥३॥

अर्थ :
देवा आता तुमचे चरण पाहिल्यानंतर माझे मन कोठे धाव घेईल ? तुमचे चरण दर्शन झाले त्यामुळे माझा सर्व भाग क्षीण गेला असून सर्वत्र आनंद झाला आहे. तुमचे प्रेमरसामुळे तुमच्या पायाला माझी मिठी बसली असून तुमचे नाम घेण्याची मोठी आवड माझ्या मुखाला लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या योग्यतेनुसार आमचे जोगेच विठ्ठलाचे खरे माप आमच्या पदरात पडले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग