वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

विश्वी विश्वंभर । बो

🙏 3. संत तुकाराम · ABH-077231 · अभंग क्र. २९०७

2907.
विश्वी विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥
जगी जगदीश । शास्त्रे वदती सावकाश ॥धृपद॥
व्यापिले हे नारायणे । ऐसी गर्जती पुराणे ॥२॥
जनी जनार्दन । संत बोलती वचने ॥३॥
सूर्‍याचिया परी । तुका लोकी क्रीडा करी ॥४॥

अर्थ :
सर्व विश्वामध्ये विश्वंभरच सारभूत आहे असे वेदांतच बोलत आहे. सर्व जगामध्ये एक जगदीश्वरच आहे असे शास्त्रच सावकाशपणे सांगत आहे. नारायणाने सर्व चराचर व्यापून टाकले आहे असे पुराणे गर्जून सांगतात. सर्व लोकांमध्ये जनांमध्ये एक जनार्दन आहे असे संत सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, सूर्य सर्व विश्वाला प्रकाश तर देतो परंतू कोणत्याही गोष्टीमध्ये लिप्त होऊन राहात नाही त्याप्रमाणे मी सर्व लोकांमध्ये वावरतो क्रिडा करतो व्यवहार तर करतो परंतू मी कोणामधेही राहात नाही मी सर्वांमध्ये राहून देखील अलिप्त राहतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग